The Earth NGO
 An Organization in Special Consultative Status with the United Nations Economic and Social Council since 2019

‘सन्मान महाराष्ट्राचा’

राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा अशी ओळख असलेली मायभूमी म्हणजे महाराष्ट्र... संताची, शूरवीरांची आणि विचारवंतांची मायभूमी म्हणजे महाराष्ट्र...मराठी माणसाची ओळख सांगायची झाली तर... 'सिंहाच्या जबड्यात घालुनी हात.. मोजितो दात.. अशी ही जात.. मराठ्याची' महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली १ मे, १९६० रोजी. पण ही स्थापना इतकी सोपी नव्हती. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना बलिदान द्यावं लागलं. म्हणूनच म्हणतात की इतर राज्यानं फक्त भूगोल असतो,पण महाराष्ट्राला इतिहास आहे. राजे-महाराजे, समाजसुधारक, संत महात्मे या राज्यात जन्माला आले हे आपलं भाग्यच म्हणायच. अशा या आपल्या मायभूमीत साजरा होतोय 'earth’ एनजीओ प्रस्तुत "सन्मान महाराष्ट्राचा २०२४" हा सन्मान सोहळा. महाराष्ट्रात तसेच देशात/परदेशात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आप-आपल्या क्षेत्रात अमूल्य योगदान देऊन महाराष्ट्राच्या प्रगतीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्यांचा हा सन्मान सोहळा! हा जसा रुढी-परंपरा, संस्कृतीने सजलेला आहे तसाच तो नटलेला आहे विविध कलांनी. ह्या सगळ्याचा अविष्कार असणार आहे 'सन्मान महाराष्ट्राचा' या सन्मान सोहोळ्यात. प्रशासकीय, पत्रकारिता, वैद्यकीय, इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी करून महाराष्ट्र राज्याच्या विकासात मोलाचा हातभार लावणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा 'सन्मान महाराष्ट्राचा' या सन्मान सोहोळ्यात सत्कार करून त्यांना गौरवांकित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “सन्मान महाराष्ट्राचा २०२३” या समारंभाच्या अभूतपूर्व यशानंतर, ‘earth’ एनजीओ द्वारे पुन्हा एकदा संयोजित केला जात आहे एक भव्य दिव्य आकर्षक व दिमाखदार कार्यक्रम “सन्मान महाराष्ट्राचा २०२४”. आपण सारे एकत्र येऊया आणि महाराष्ट्राचा सन्मान करत म्हणुया.. 'बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' उत्सव उत्साहाचा महाराष्ट्रातील रत्नांचा लवकरच येत आहे #सन्मान महाराष्ट्राचा २०२४

Success Video

“शाबासकीची थाप”

सन्मान महाराष्ट्राचा हा सोहळा यंदाच्या वर्षी सुद्धा भव्यदिव्य स्वरुपात साजरा होणार आहे. आपल्या आजुबाजुला अनेक लोक त्यांच्या कला, सामाजिक, शैक्षणिक, ई. क्षेत्राच्या माध्यमातुन जनसामान्य लोकांसाठी सकारात्मक कार्य करत असतात.त्यांचं कार्य असंख्य लोकांच्या उपयोगास येते.परंतू बऱ्याचदा त्यांची दखल घेतली जात नाही. म्हणूनच, अशी कलाकार मंडळी, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य करणारे व्यक्ति आणि त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरू शकते,अशा व्यक्तींना सन्मान महाराष्ट्राचा या व्यासपीठामार्फत शाबासकीची थाप देऊन गौरवांकित करण्याचा ‘earth’ एनजीओ चा मानस आहे, जेणेकरून अशा व्यक्तींचे कार्य जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि त्यांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करता येईल. यासाठी, आपण किंवा आपल्या माहितीत असणाऱ्या अशा व्यक्तिंपर्यंत हा मैसेज नक्की पाठवा. विडिओ करून त्यात आपण करत असलेल्या कार्याची/कलेची माहिती द्यावी. त्यासाठी आपण आपला जास्तीत जास्त ६० सेकंदाचा व्हिडीओ +91 84969 84969 या क्रमांकावर किंवा st@theeart.ngo या ईमेल वर शेयर करू शकता #उत्सव_उत्साहाच #महाराष्ट्रातील_रत्नांचा लवकरच येत आहे #सन्मान महाराष्ट्राचा २०२४

Instagram Videos

When our power of choice is untrammelled and when nothing prevents our being able to dowhat we like best every pleasures to be welcomed every pain avoided but in certain circumstances and owing to the claims of duty or the obligation.

Book Your Seat

Member Name * Member Photo * + Add Member
- Remove
=